जर तुम्हाला नुकतीच एखादी नोकरी लागली आहे किवा बँकेत तुम्हाला तुमचे pan card हे aadhar card ला Link केले आहे काय अशी विचारणा झाली आहे काय ? तर याच विषयावर म्हणजेच आधार कार्ड ला पण कार्ड कसे लिंक करावे याबाबत आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत आणि त्याचा उपयोग करून आपणही घर बसल्या मोबाईल वर अथवा Tab वर किवा कॉम्प्युटर वर आपण करू शकता चला तर मग पाहूया.
Table of Contents
थोडक्यात माहिती : Information
आधार कार्ड हे बायोमेट्रिक माहितीचा वापर करून बनवलेले असल्याने प्रत्येक व्यक्तीला एकच Aadhar Card अशी वेगळी ओळख निर्माण होते. तसेच कुठल्याही शासकीय कामासाठी इतर अनेक ओळखपत्र जवळ असण्यापेक्षा आधार कार्ड चा वापर हल्ली वाढला आहे. त्याचबरोबर बँक खाते योजनेमध्ये मुख्य पुरावा म्हणून आधार कार्डचा होत असलेला वापर, सरकारी योजनेच्या अनुदानाबाबतही लाभार्थ्यांना मिळणारा जलद लाभ, तसेच पासपोर्ट काढण्यासाठी होणारा आधार कार्ड चा वापर यामुळे आधार कार्ड वापरणे हि जणू एक काळाची गरज बनली आहे.
आयकर विभागाकडून प्रत्येक नागरिकाला त्याच्या उत्पन्नाच्या अंतर्गत येणाऱ्या रकमे बरोबर Pan Card काढण्यासाठी काही स्तर निश्चित करण्यात आले आहेत. Income Tax Department कडून प्रत्येक व्यक्तीला एक दहा अंकाचा Unique Identification Alphanumeric Number दिला जातो ज्यामध्ये अंक आणि अक्षरांचा हि समावेश करण्यात येतो. पॅन कार्ड हे भारतीय नागरिकासाठी एक ओळखपत्र म्हणून देखील वापरले जाते. बँक खाते वापरामध्ये पॅन कार्ड ची सध्या सतत मागणी होते.
Why Importance of Link Pan Card to Aadhar Card : पॅन कार्ड हे आधार कार्डशी लिंक का करायचे याचे महत्व :
भारतात राहणाऱ्या प्रत्येक भारतीयाला आधार कार्ड काढणे व पॅन कार्ड काढणे हि आजच्या काळातील गरज होऊन बसली आहे कारण आपण कोणत्याही शासकीय ऑफिस, बँक खाते, शेअर मार्केट चे demat जरी काढायचे असेल तरीही पॅन कार्ड गरजेचे आहे तसेच कुठल्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी गेल्यानंतरही आपल्याला सर्वात प्रथम आपल्याकडे Aadhar Card आणि Pan Card आणले आहे का हा प्रश्न विचारला जातो. आधार कार्ड ला जसे प्रत्येक व्यक्तीचा बायोमेट्रिक माहितीचा वापर करून बनवलेले आहे तसेच पॅन कार्ड हेही प्रत्येक भारतीयाच्या दैनंदिन व्यवहार, पैशाची उलाढाल याबाबत सर्व तपशिला बाबत माहिती जमा केली जाते.
आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक हे आयकर परतावा भरण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. जर एखाद्या व्यक्तीचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केलेले नसेल तर आयकर विभाग त्या व्यक्तीचे विवरणपत्र स्वीकारत नाही आणि त्यामुळे आपल्याला आयकर देयक त्या वर्षाचे भरता येत नाही इतकी महत्वाची भूमिका आधार कार्ड व पण कार्ड लिंक ची झाली आहे. याच बरोबर जर आपल्याला परदेशी जाण्यासाठी passport साठीही आधार कार्ड बरोबरच पॅन कार्ड ची ही ओळख पत्र म्हणून मागणी केली जाते.
पॅन कार्ड हे आधार कार्डशी लिंक का करायचे याची ५ कारणे : 5 Points
पर्मनंट अकाउंट नंबर ज्याला पॅन म्हणुन ओळखले जाते ती एक प्रकारची इलेक्ट्रॉनिक प्रणाली आहे ज्यामुळे पॅन वरून एखादया व्यक्तीची किंवा कंपनी इत्यादींची कराबाबतची माहिती नोदवलेली असते. पॅन कार्ड क्रमांक हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो.
Benefits of Pan Card Linking :
पॅन कार्ड लिंकींग मुळे ब-याच आवश्यक प्रक्रिया सोप्या झालेल्या आपणास पहावयास मिळतात. जसे की, पॅनकार्ड चा वापर पत्त्याचा पुरावा, ओळखीचा पुरावा, व्यवसायाची नोंदणी, कर भरण्याकरिता, नवीन फोन कनेक्शन मिळविण्याकरिता, नवीन गॅस कनेक्शन घेण्याकरिता, शेअर मार्केटसाठी लागणा-या डिमॅट खाते उघडण्यासाठी, म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुक करण्यासाठी, बॅंकेत खाते उघडण्यासाठी तसेच त्यामध्ये आर्थिक व्यवहार करण्यासाठी आणि आयकर कर भरण्यासाठीही पॅनकार्ड लिंकचा वापर केला जातो.
पॅनकार्ड आधार कार्डला लिंक कसे करावे : How to Link :
पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करण्याकरिता प्रथम आपल्याला आयकर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/login यावर जावे लागेल.
या मधील Home या बटनावर क्लिक केल्यानंतर एक डाव्या बाजूला Quick Links नावाचा मेनू ओपन होईल त्यामधील Link Aadhar यावर क्लिक करावे.
त्यावर क्लीक केल्यानंतर पुढील ओपन होणारी विंडो मध्ये आपला पॅन कार्ड क्रमांक टाकायचा आहे आणि त्या बरोबर जो आधार क्रमांक पॅन कार्डशी लिंक करायचा आहे तो देखील त्या पुढील चौकोनात टाकायचा आहे. सविस्तर आकृती पुढील चित्रात दाखवली आहे. त्यानंतर Validate या बटनावर क्लिक करावी.
Validate या बटनावर क्लिक केल्यानंतर पुढील स्क्रीन दाखवेल ज्यामध्ये Payment Details Not Found अशा window मध्ये एकूण ३ सूचना असतील ज्या खालील चित्रात दाखवल्या आहेत. त्यामध्ये आपल्या पॅन कार्ड आधार क्रमांक शी लिंक करायचा आहे त्याची दंड रक्कम म्हणून १००० रुपये भरावे लागणार आहेत यावरील Continue to Pay Through E-Pay Tax यावर क्लिक करावी तसेच त्याबाबतची माहिती पुढील चित्रात सविस्तर दाखवली आहे
Continue to Pay Through E-Pay Tax यावर क्लिक केल्यानंतर त्यापुढील येणाऱ्या चौकोनात पुन्हा आपला पॅन कार्ड क्रमांक टाकायचा आहे तसेच त्यापुढील चौकोनात पुन्हा पॅन कार्ड क्रमांक टाकायचा आहे आणि त्यापुढील चौकोनात आपल्या जवळ असणारा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि Continue या बटनावर क्लीक करायची आहे म्हणजे मग आपल्याला आपल्या मोबाईल वर confirmation करण्यासाठी एक otp येईल याबाबत पुढील चित्रात माहिती दाखवली आहे.
Continue या बटनावर क्लीक केल्यानंतर आपल्याला एक OTP विचारला जाईल तो त्यापुढील येणाऱ्या चौकोनात टाकायचा आहे त्याकरिता ३ संधी देण्यात आलेल्या आहेत व यासाठी १५ मिनिटांची वेळ ही देण्यात आलेली आहे. या चौकोनामध्ये आपल्या मोबाईल वर आलेला OTP टाकल्यानंतर पुन्हा Continue या बटनावर क्लीक करावी म्हणजे पुढील चित्रात दाखवल्याप्रमाणे स्क्रीन समोर दिसेल त्यावर You have successfully verified through mobile OTP, Click Continue to make a new payment असा संदेश येईल व त्याखाली आपला पॅन कार्ड क्रमांक आणि मोबाईल क्रमांक दाखवलेला असेल त्यापुढील Continue या बटनावर क्लीक केल्यास पुढील स्क्रीन येईल.
वरील प्रमाणे विंडो आल्या वर त्यावरील Income Tax या मधील Proceed बटनावर क्लिक करावी. म्हणजे त्यापुढील असणारा Payment हा Option उघडेल. तो पुढील स्क्रीन प्रमाणे असेल त्यातील assessment year यामध्ये आपल्याला हवे असलेले वर्ष निवडावे आणि त्यापुढील सूचीमधून “Other Receipt 500” यावरच क्लिक करावी कारण आयकर विभागाकडून पॅन कार्ड व आधार कार्ड क्रमांक लिंक रक्कम भरण्यासाठी सदरची शीर्ष देण्यात आले आहे. त्या खालीच येणाऱ्या Sub type of Payment या खाली Fee For Delay In Aadhar Pan Link यावर क्लीक करावी व पुन्हा Continue या बटनावर क्लीक करावी.
त्यापुढील येणाऱ्या स्क्रीन वर automatically 1000 रुपये भरणा असलेले शीर्ष दाखवले जाईल त्यावर continue या बटनावर क्लिक करावे. मग त्यापुढील येणाऱ्या बँकेच्या लिस्ट मधून आपण कसे payment करणार आहोत त्या बँकेचे Online payment करावे. Online payment केल्यानंतर एक पावती आपल्या स्क्रीन वर दाखवली जाईल ती आपल्याला download करून आपल्या जवळ ठेवायची आहे.
या step नंतर पुन्हा screen २ मध्ये दाखविल्या प्रमाणे क्रिया करून पुन्हा आपल्याला Quick Links नावाचा मेनू ओपन होईल त्यामधील Link Aadhar यावर क्लिक करावे. तेथे आपले payment यशस्वी झाले आहे असे सांगितले जाईल त्यापुढे पुन्हा आपला पॅन कार्ड व आधार कार्ड क्रमांक तेथे टाकायचा आहे आणि तो टाकल्या नंतर एक OTP येईल तो टाकल्यानंतर आपली पॅन कार्ड व आधार कार्ड क्रमांक लिंक प्रक्रिया पूर्ण झाली असा संदेश येईल.
Last Date of Pan Card Aadhar Card Link :
पॅन कार्ड व आधार कार्ड क्रमांक लिंक करण्यासाठी आयकर विभागाने ३० जुन २०२३ देण्यात आलेली होती आणि जे पॅन कार्ड व आधार कार्ड या दरम्यान लिंक केले जाणार नसतील ते inactive केले जाणार आहेत. सर्व नागरिकांना आपले पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक केले नाहीत अशा नागरिकांना ते ३० जुन २०२३ नंतर दंड भरून लिंक करावे लागणार आहे.
What is the last date for PAN-Aadhaar Link 2024?
आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी आयकर विभागाने शेवटची संधी म्हणून ३० जुन २०२३ हि तारीख देण्यात आली आहे.
What is the penalty for linking PAN with Aadhaar ?
जे पॅन कार्ड आणि आधार कार्ड ३० जुन २०२३ पर्यंत लिंक करणार नाहीत अशा नागरिकांना १००० रुपये दंड भरून आपले आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करता येणार आहे.
How many days it will take to link PAN with Aadhar?
आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक हि प्रोसेस आयकर विभागाकडून होत असते या प्रोसेस साठी सर्वसाधारणपणे ५ ते ७ दिवस लागतात.