भारत सरकार द्वारा लहान मुले तसेच प्रत्येक भारतीय व्यक्तीसाठी एक आधुनिक ओळख म्हणून १२ अंकांचा Aadhaar Card हे एक ओळखपत्र तयार केले आहे. आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयासाठी एक ओळख आहे. बायोमेट्रिक माहितीच्या आधारा मुळे आधार कार्ड हे बनवलेले असल्याने प्रत्येक व्यक्तीचा वेगळेपणा दाखवते. आधार कार्ड हि ऐच्छिक सेवा असल्याने प्रत्येक भारतीय आपले कागदपत्र देऊन ती घेऊ शकतो. आधार कार्ड मध्ये प्रत्येक व्यक्तीला एक unique Aadhaar आयडी क्रमांक दिला जातो. आधार एक सर्व शासकीय कार्यालयात व इतर ठिकाणी चालणारे ओळखपत्र म्हणून हि नावारुपास आले आहे. जसे कि रेशन कार्ड, पासपोर्ट इत्यादी सेवा.
Table of Contents
Introduction :
Unique Identification Authority of India (UIDAI) चे प्रथम अध्यक्ष माननीय नंदन नीलकणी यांच्या मते आधार कार्डमुळे भारत सरकारची काही अब्ज रुपयांची बचत झाली आहे. प्रत्येक लाभार्थ्याला वेगळा दिला जाणारा क्रमांका मुळे जर एखाद्या लाभार्थ्याचे नाव परत यादीत आले कि या आधार क्रमांकामुळे हि गोष्ट लक्षात येते. त्यामुळे आत्तापर्यंत चाललेली आर्थिक व्यवस्थेतील फसवणूक दूर होण्यास खूप मोठी मदत झाली आहे.
बायोमेट्रिक माहितीच्या वापरामुळे आधार कार्ड प्रत्येक व्यक्तीला एक वेगळी ओळख देते. याचाच आणि एक फायदा म्हणजे कुठल्याही शासकीय कामासाठी इतर अनेक ओळखपत्र नेण्य ऐवजी आधार कार्ड चा वापर वाढला आहे. जसे कि जन धन योजना, बँक खाते योजनेमध्ये मुख्य पुरावा म्हणून आधारच वापर. आधार कार्ड मुळे लाभार्थ्यास तो पात्र असलेल्या सरकारी योजनेच्या अनुदानाचा लाभ घेऊ शकतो. आधार कार्डचा वापर आता पासपोर्ट काढण्यासाठीही होऊ लागला आहे आणि आधार प्रक्रीयामुळे त्याला वेग आला आहे. कारण अनेक कागद पत्र देण्याऐवजी एकच आधार कार्ड जोडून अर्ज करता येऊ शकतो. ज्यांनी आपल्या एलपीजी connection साठी आधार क्रमांक जोडला आहे त्यांना त्यांच्या थेट बँक खात्यात सरकार सबसिडी जमा करत आहे.
Importance of Aadhaar Card :
भारताबरोबरच इतर अन्य देशातही Aadhaar Card एक ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरले जात आहे. २०२४ या वर्षातही बँकेत खाते उघडावयाचे असो किंवा नवीन मोबाईल साठी सिम कार्ड घेण्यासाठीही Aadhaar Card चा उपयोग केला जात आहे. प्रत्येक भारतीयाला एक ओळख मिळावी याकरिता इतकेच काय तर Covid काळातही लस घेण्यासाठी आरोग्य केंद्रामध्ये आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. याच प्रत्येक आधार कार्ड मध्ये १२ अंकांचा समावेश केला जातो त्याला आधार क्रमांक किवा युआयडी असे म्हणतात आणि जर आपल्याला हेच आधार कार्ड आपल्या मोबाईल वर अथवा कॉम्पुटर वर Download करावयाचे असेल तर हा १२ अंकांचा क्रमांक लक्षात ठेवणे अतिशय गरजेचे आहे आता हा झाला पर्याय पहिला.
आता आपण पर्याय दुसरा पाहूया. यामध्ये दुसरा प्रकार हा Enrollment ID. जो आपल्याला आधार नोंदणी प्रक्रियेदरम्यान मिळतो आणि तो २८ अंकांचा असतो. आता असे कि जर वरील दोनही क्रमांक आपल्याला लक्षातच नसतील तर काय आणि आधार कार्ड तर download करायचे आहे पण कसे करावे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर आम्ही आज यामध्ये वरील दोनही क्रमांक लक्षात नसले तर कशा पद्धतीने हरवलेला किवा विसरलेला आधार क्रमांक परत मिळविता येईल ते पाहूया.
Role of Mobile During Aadhaar Card Registration :
मोबाईल ने आजकाल सर्व गोष्टी शक्य झाल्या आहेत त्यातल्या त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या Aadhaar Card शी आपला लिंक असलेला आपला मोबाईल हि एक नव्याने ओळख तयार झाली आहे. कारण आपण आधार नोंदणी करताना आपण मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्ड शी जोडलेला असणे हे खूप आवश्यक झाले आहे कारण त्यानंतर जर आपल्या नावात, पत्त्यात दुरुस्ती, बदल याकरिता ओ टी पी क्रमांक प्राप्त करण्यासाठी अतिशय आवश्यक गोष्ट झाली आहे. आधार करण्याच्या प्रक्रियेमध्ये ओ टी पी क्रमांक हा अतिशय महत्वाचा भाग आहे.
आधार कार्ड नोंदणी करताना आपला मोबाईल क्रमांक आणि ई मेल आयडी दोन्ही टाकणे अतिशय गरजेचे असते ज्यामुळे आपल्याला आपल्या आधार कार्ड अर्जाच्या प्रक्रीयाबद्दल वेळोवेळी माहिती दिली जाते आणि जर आपला मोबाईल क्रमांक आपण नोंदणी करताना दिला नसल्यास त्यासाठी पुन्हा नव्याने जवळच्या आधार सेवा केंद्रात जाने आवश्यक आहे.
पण हा मोबाईलच नसला किवा त्या क्रमांकाशिवाय आपल्याला आधार कार्ड download करायचे आहे तर कसे करावे याबाबत आपण माहित पाहूया.
Simple Steps for Download E-Aadhaar Card Without Aaadhar No.
First Step to Download Aadhar Card Without Aadhar No.
UIDAI ने आधार कार्ड Download करण्याकरिता मोबाईल क्रमांक अनिवार्य केला नसला तरी Aadhaar Card Download करताना अनेक अडचणी समोर येतात. त्यासाठी खालील पद्धतीचा वापर करावा.
- प्रथम UIDAI चे अधिकृत संकेतस्थळ “https://uidai.gov.in” यावर जावे.
- त्यावरील Homepage वरील My Aadhaar या बटनावर क्लिक करावे.
- त्यानंतर येणाऱ्या “My Aadhaar” यावर क्लिक करावी.
- सर्वात शेवटी येणाऱ्या Mobile not Registered with Aadhaar? Please follow these steps to get it registered. यावर क्लीक करावी.
- पुढे येणाऱ्या स्क्रीन वर “Verify Your Mobile Number” यावर क्लिक करावी.
- तरीहि आपले आधार कार्ड येत नसेल तर खालील प्रमाणे कार्य पद्धती करावी.
How to Update New Mobile Number for Aadhaar :
आपल्याला जर नवीन मोबाईल क्रमांक आधार कार्ड शी लिंक करायचा असेल तर प्रथम आधार च्या अधिकृत संकेतस्थळ वर जावे. त्यानंतर तेथील “” या पैकी आपल्या जवळच्या आधार नोंदणी केंद्राची निवड करावी त्यानंतर आपल्याला हव्या असलेल्या दिवशीची Appointment घेतल्यानंतर आपण तेथे जाऊन आपले आवश्यक बायोमेट्रिक माहिती व इतर माहिती च्या आधारे आपल्याला एक URN क्रमांक प्राप्त होईल ज्या आधारे आपल्याला आपण केलेल्या बदलाबाबत सूचना मिळतील. अशा प्रकारे आपण मोबाईल क्रमांक update करू शकतो.
आधार कार्ड क्रमांक नसेल तरीही आधार कार्ड काढता येते का ?
होय, परंतु त्याकरिता वरील प्रकारे कृती करावी म्हणजे आधार कार्ड काढता येईल.
आधार क्रमांकाला मोबाईल क्रमांक लिंक केलेला नसेल तर आधार कार्ड निघेल का ?
होय, याकरिता वरील कृती मधील सर्वात शेवटच्या उतार्यामध्ये उत्तर दिलेले आहे कृपया त्याचे अवलोकन करावे.
कशा पद्धतीने आधार कार्ड download करता येईल याकरिता image आधारे समजून घेता येईल का ?
होय सर्वात शेवटच्या उताऱ्या आधी एक चित्र दिले आहे ज्याद्वारे आपल्याला लक्षात येईल.
How many attempts to download my aadhaar card ? आधार कार्ड किती वेळा download करता येते ?
आपण आधार कार्ड किती हि वेळा download करू शकतो याकरिता कुठलेही बंधन नाही.
Conclusion :
भारत सरकार द्वारा लहान मुले तसेच प्रत्येक भारतीय व्यक्तीसाठी एक आधुनिक ओळख म्हणून आधार कार्ड बायोमेट्रिक माहितीच्या आधारा मुळे व्यक्तीचा वेगळेपणा दाखवते हि ऐच्छिक सेवा असल्याने प्रत्येक भारतीय आपले कागदपत्र देऊन unique Aadhaar आयडी क्रमांक दिला जातो. सर्व शासकीय कार्यालयात व इतर ठिकाणी चालणारे ओळखपत्र म्हणून एक ओळख आहे.