Aadhar Card PVC For Just Rs. 50 : Grab the Amazing Deal

Unique Identification Authority of India म्हणजेच UIDAI ने भारतीय नागरिकांसाठी सुरु केलेली सेवा असून ती Aadhar Card PVC नावाने सुरु केली आहे. या अंतर्गत कोणत्याही नागरिकास आपले आधार कार्ड पीव्हीसी काढावयाचे असल्यास अतिशय नाममात्र शुल्क भरून घेऊन त्यांचे आधार कार्ड वरील तपशील पीव्हीसी कार्ड वर प्रिंट करून देण्याची सुविधा प्राप्त करून दिली आहे. याबरोबरच ज्या नागरिकांकडे आधार कार्ड नोंदणी करतेवेळी जो मोबाईल क्रमांक होता तो जर नसेल तर पर्याय म्हणून दुसरा मोबाईल क्रमांक वापरूनही आपल्याला PVC Aadhar Card order करता येऊ शकते.

तर हे आधार कार्ड कशा प्रकारे मागवता येईल याबाबत आपण आज या ठिकाणी पाहणार आहे. सर्वसाधारण आधार कार्ड पेक्षा आधार कार्ड पीव्हीसी या दोन्हीमध्ये काय फ़रक़ आहे हे हि आपण आज पाहणार आहोत. step by step आधार कार्ड पीव्हीसी कोणा-कोणास काढता येईल, ते कशा प्रकारे तुम्हाला घरच्या घरी download करता येईल, त्याकरिता त्याला लागणारी फी online कशी paid करता येईल त्याचबरोबर त्याची नोंदणी कुठे करता येईल याबाबत ची सर्व माहिती आपण आज या लेख मध्ये सविस्तर अशा स्वरुपात पाहणार आहोत.

What is Aadhar Card PVC : आधार कार्ड पीव्हीसी हे काय आहे ?

आधार कार्ड नोंदणी केल्यानंतर नागरिकांना Unique Identification Authority of India म्हणजेच UIDAI कडून Laminated पेपर वर दिले जाते. त्याचा आकारही मोठा असल्याने कुठेही ओळखपत्र म्हणून सोबत घेऊन जाणे कठीण जात होते. आधार कार्ड हे एक विश्वासार्ह ओळखपत्र म्हणून ओळखले जाते.

आधार कार्ड पीव्हीसी हे टिकण्यास चांगले, जवळ बाळगण्यास त्याच बरोबर कुठेही सोबत नेण्यास अत्यंत सोयीचे पडते. या पीव्हीसी आधार कार्ड वरही क्यू आर देण्यात आलेला आहे. Laminated आधार कार्ड तसेच eAadhar Card, mAadhar Card आणि Aadhar Card PVC हे सर्व वैध ओळखपत्र असून ते शासकीय कामांसाठी ग्राह्य धरले जातात.

What is Eligibility & Other Features of Aadhar Card PVC :

Who is apply for Aadhar Card PVC : आधार कार्ड पीव्हीसी करिता कोण अर्ज करू शकते.

ज्या व्यक्तीकडे वैध आधार कार्ड असेल ते सर्व व्यक्ती अगर नागरिक या आधार कार्ड पीव्हीसी प्राप्त करण्यासाठी अर्ज करू शकतो. कारण आधार कार्ड पीव्हीसी आपल्याला download करण्यासाठी आपला जुना वैध १२ अंकी आधार कार्ड क्रमांक असणे आवश्यक आहे. या १२ अंकी आधार कार्ड क्रमांक शिवाय आपल्याला आधार कार्ड पीव्हीसी साठी नोंदणी करता येत नाही.

What is Important Document for Aadhar Card PVC : आधार कार्ड पीव्हीसी करिता लागणारी महत्वाची कागदपत्रे :

आधार कार्ड पीव्हीसी download करण्याकरिता आधार कार्ड क्रमांक लागतो तो सोडून बाकी कोणतेही इतर कागद पत्रे आधार कार्ड पीव्हीसी करिता लागत नाहीत.

7 Security Features of Aadhar PVC Card ? : आधार पीव्हीसी कार्ड ची ७ वैशिष्ट्ये काय आहेत ?

  • आधार होलोग्राम
  • सूक्ष्म अक्षरातील मजकूर
  • क्यू आर कोड Tamper Proof
  • आधार कार्ड पाठविल्याची तारीख आणि आधार कार्ड छपाई केल्याची तारीख
  • Guilloche Pattern
  • Ghost प्रतिमेचा आधार कार्ड मध्ये केलेला वापर
  • Emboss केलेला आधार चा लोगो

Fee of Aadhar PVC Card ? : आधार पीव्हीसी कार्ड साठी लागणारी फी :

आधार पीव्हीसी कार्ड साठी UIDAI कडून भारतीय नागरिकांना नाममात्र शुल्क ५० रुपये इतके आकारले जाते.

Payment Gateway for Aadhar PVC Card : आधार कार्ड पीव्हीसी शुल्क गेटवे

आधार कार्ड पीव्हीसी याचे शुल्क भरण्यासाठी (१) क्रेडीट कार्ड (२) डेबिट कार्ड (३) इंटरनेट बँकिंग (४) युपीआय आणि (५) Wallet यासारखे Payment Gateway आधार कार्ड पीव्हीसी चे शुल्क रुपये ५० भरण्यासाठी देण्यात आले आहे.

How to Apply for Aadhar Card PVC Step by Step Guide : आधार कार्ड कसे काढावे याबाबत माहिती.

आधार कार्ड पीव्हीसी काढण्याकरिता आपल्याला सर्वात प्रथम आधार चे अधिकृत संकेतस्थळ https://uidai.gov.in/en यावर जाणे गरजेचे आहे. त्या नंतर My Aadhaar मेनू मधील “Order Aadhaar PVC Card” या पर्यायावर क्लिक करावी. यामध्येच Aadhar Card Download करण्या साठीही पर्याय देण्यात आला आहे. जे यापुढील चित्रात दाखवले आहे.

aadhar-card-pvc

“Order Aadhaar PVC Card” या पर्यायावर क्लिक केल्या नंतर आपल्याला आपला १२ अंकाचा आधार कार्ड क्रमांक किंवा २८ अंकाचा Enrollment क्रमांक टाकावा लागणार आहे. तो बरोबर टाकल्यानंतर त्याखाली दाखवलेले Captcha त्यापुढील चौकोनात Type करायचा आहे. त्यानंतर जर आपल्या आधार कार्ड ला मोबाईल लिंक केलेले असेल तर पुढे सांगितलेली कृती करण्याची आवश्यकता नाही परंतु जर तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल क्रमांक लिंक केलेला नसेल तर मात्र Captcha खालील “My Mobile Number is not Registered” या tick वर क्लीक करावी म्हणजे आपल्याला एक मोबाईल क्रमांक विचारला जाईल ज्यावर आपल्याला OTP प्राप्त होणार आहे. त्यानंतर Send OTP यावर क्लीक केल्यानंतर एक OTP आपल्याला आपल्या मोबाईल वर प्राप्त होईल तो त्या ठिकाणी टाकायचा आहे.

त्यापुढील Next यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक SRN क्रमांक प्राप्त होईल जो आपल्याला जर आपले आधार कार्ड वेळेत प्राप्त झाले नाही तर ते चेक करण्याकरिता आवश्यक आहे. यापुढील स्टेप वर ज्यासाठी त्याखालील “I hereby Confirm that I have read and Understood the Payments/Cancellation/ Refunds Process” या वर क्लिक करून पुन्हा Next यावर क्लिक करावी.

Next यावर क्लिक केल्यानंतर आता Aadhar Card PVC शुल्क भरण्याकरिता Payment Gateway आपल्याला समोर दाखवण्यात आले आहेत यामधून कुठल्याही एका पद्धतीने आपण online पद्धतीने शुल्क अदा करू शकतो आणि आपले आधार कार्ड पीव्हीसी order करू शकतो.

How many days will it take to receive “Aadhaar PVC Card” after creating successful request?

अर्ज मिळालेल्या तारखेपासून ५ दिवसामध्ये UIDAI कडून Speed Post ने अर्जदाराला आधार कार्ड पीव्हीसी मिळते.

What is SRN No. ?

SRN No. म्हणजेच (Service Request Number) जो आपल्याला आधार कार्ड order केल्यानंतर त्याची स्थिती तपासण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

What are the different forms of Aadhaar ?

आधार कार्ड चे Aadhar Letter, Aadhar PVC Card, eAadhar mAadhar हे पर्याय आहेत.

Leave a Comment